पनवेल वाहतूक पोलीस चौकीचे मंगळवारी उद्घाटन; महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ

लेखक:

पनवेल वाहतूक पोलीस चौकीच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देताना पदाधिकारी

पनवेल : पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल वाहतूक पोलीस चौकीचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. पनवेल महानगर प्रेस क्लबच्या माध्यमातून या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. नितीन जगताराम पाटील यांच्या हस्ते चौकीचे उद्घाटन होणार आहे.

नवीन पनवेल येथील एच.डी.एफ.सी. सर्कल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. शहरातील वाढती वाहतूक, वाहनांची वर्दळ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलीस चौकी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. या चौकीमुळे वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यास हातभार लागेल.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. मंगेश चितळे, सभागृह नेते मा. श्री. प्रकाश बिनेदूर, तसेच महात्मे रुग्णालयाचे मा. श्री. डॉ. नितीन महात्रे उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय वाहतूक विभाग नवी मुंबईचे पोलीस उपआयुक्त मा. डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस उपआयुक्त मा. श्री. योगेश गावडे, पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सुभाष पुजारी, तसेच मा. श्री. आंबुवर पाटील आणि मा. श्री. बाळा कुंभार यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांत शेडगे यांच्या नेतृत्वाखाली क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाहतूक व्यवस्थेला शिस्त, नागरिकांना सुरक्षितता आणि पनवेलच्या विकासाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Discover more from पनवेल गावकरी संकेत

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading