लेखक:

कळंबोलीत सप्तशृंगी मातेचा जागर, खान्देशवासियांची मांदियाळी”
paragraphs = [ “””देशामधून नवी मुंबईतील कळंबोली येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी एकवटलेल्या सप्तशृंगी मातेच्या भक्तांनी वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे सुबक, मनमोहक असे लोकवर्गणीतून दिमाखदार मंदिर साकारण्यात आले आहे. या मंदिरातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. समाजप्रबोधन व समाजोपयोगी विविध उपक्रम आयोजित करून सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टने एक आगळावेगळा समाजसेवेचा आदर्श घालून दिलेला आहे.”””, “””नवरात्र उत्सवामध्ये विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे वैविध्यपूर्ण आयोजन करून भक्तांना एक प्रकारे मातेचा आशीर्वादच मिळत असतो. नवरात्राच्या कालावधीत नवी मुंबईतील खान्देशातील मातेचे भक्तगण तसेच राज्यातील विविध प्रांतांतील सर्व जाती-धर्मांचे भक्तगण आवर्जून कळंबोलीतील मंदिरात उपस्थिती दर्शवून वणीच्या सप्तशृंगी मातेबद्दलची अंतःकरणातील निस्सीम भक्ती दर्शवून देतात.”””, “””कळंबोली वसाहतीची निर्मिती ज्यावेळेस केली गेली, त्यावेळी राज्यातील तसेच देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून आपले उदरनिर्वाह करण्यासाठी कळंबोली वसाहतीमध्ये लाखो नागरिक येऊन कायमचेच कळंबोलीचे रहिवासी झाले. खान्देश हा शेतीपूरक प्रदेश असल्याने येथून कळंबोली तसेच नवी मुंबईमध्ये लाखो खान्देशवासी आपले नशीब आजमावण्यासाठी येऊन राहिले. खान्देशवासियांची वणी गडावरील सप्तशृंगी माता हे देवस्थान हृदयस्थानी असून कायम आशीर्वाद देणारी माता आहे.”””, “””सर्व बंधू-भगिनींना एकत्रित करावे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून खान्देशातील विविध पारंपरिक कला, परंपरा, धार्मिक उत्सव, सण, पाककला व विविध उपक्रमांतून समाज बांधवांचे स्नेहसंमेलन व्हावे, या उद्देशाने सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टची निर्मिती मानकू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2000 मध्ये करण्यात आली. त्यावेळी मातेचे छोटेसे मंदिर बांधून नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात. त्यावेळीही नवी मुंबई तसेच ठाणे-मुंबईमधील हजारो भाविक कळंबोलीमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांत मातेच्या चरणी नतमस्तक होत असत. त्यानंतर भक्तगणांची व्याप्ती वाढत गेली व मंदिर ट्रस्टने मातेचे मंदिर भव्य-दिव्य आणि कलाकुसरीने परिपूर्ण असावे असा निर्णय घेतला.”””, “””2024 मध्ये कळंबोलीतील सप्तशृंगी मातेचे मंदिर लोकसहभागातून व मातेच्या भक्तांच्या वर्गणीतून उभारण्यात आले. मंदिर उभारणीमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व देवीचे एक भक्त दीपक आनंद बिट यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. मातेची मूर्ती मनमोहक, सुंदर असून भक्तांना कायम आशीर्वाद देणारी आहे.”””, “””या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असतेच. मंदिर ट्रस्टच्या वतीने चैत्र पौर्णिमेचे महत्त्वही आगळेवेगळे आहे. या दिवशी रात्री ठीक बारा वाजता मंदिरावरील कळसावरील भगवा ध्वज मानपान देऊन उतरवला जातो आणि त्याच वेळी नवीन भगवी पताका मंदिराच्या कळसावर फडकवली जाते. हा धार्मिक कार्यक्रम गेल्या पंचवीस वर्षांपासून अव्याहतपणे पार पाडला जात आहे.”””, “””मंदिर ट्रस्ट धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून मंदिराचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि शासनाच्या नीतीनियमानुसार सुरू आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर मानकू पाटील हे जबाबदारी सांभाळत आहेत. सचिवपदाची जबाबदारी शंकर दाडे यांच्यावर असून सहसचिव म्हणून दामोदर महते मंदिर ट्रस्टचे काम पाहत आहेत. उपाध्यक्ष म्हणून दगडू पाटील, तर सतीश पाटील, सुरेश सोनवणे, जगन पाटील, जयश्री जमादार आणि पंढरीनाथ ठाकूर हे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.”””, “””सप्तशृंगी माता ट्रस्टकडून मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मोफत रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी, डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी, मोफत तसेच माफक दरात चष्मेवाटप, मातीचे किल्ले बनवणे आणि चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श या ट्रस्टने निर्माण केला आहे.”


Discover more from पनवेल गावकरी संकेत

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading