ह.भ.प. गणेश भोईर यांचे निधन पनवेल

लेखक:

ह.भ.प. गणेश भोईर यांचे निधन पनवेल (प्रतिनिधी)  तालुक्यातील सावळे येथील ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी संप्रदायातील श्रद्धावान व्यक्तिमत्त्व ह.भ.प. गणेश आंबो भोईर यांचे दसऱ्याच्या पवित्र दिवशी वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावळे गावासह परिसरात शोककळा पसरली असून, वारकरी संप्रदायातील एका ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ग्रामस्थ आणि परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.         ह.भ.प. गणेश भोईर यांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांवर श्रद्धा ठेवत आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेशी आपले नाते जपले होते. धार्मिक संस्कार, साधी राहणी आणि प्रामाणिक जीवनशैली यांमुळे ते परिचित होते. रसायनी येथील एचओसी या सरकारी कंपनीमध्ये त्यांनी अनेक वर्षे बसचालक म्हणून इमानेइतबारे सेवा बजावली. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा राखत त्यांनी प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे नोकरी केली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ, नातेवाईक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशक्रिया विधी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र सिद्धेश्वर, गुळसुंदे येथे होणार असून, उत्तरकार्य रविवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी सावळे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.


Discover more from पनवेल गावकरी संकेत

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading