खारघरमधील दुर्लक्षित तलावातील गाळ उपसा करा!शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांची सिडकोकडे मागणी; पाणीटंचाई दूर होईपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये

लेखक:

खारघरमधील दुर्लक्षित तलावातील गाळ उपसा करा!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांची सिडकोकडे मागणी; पाणीटंचाई दूर होईपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये
पनवेल, दि.१६ (वार्ताहर) : खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे आणि पनवेल परिसरातील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी खारघरमधील ओवे कॅम्प परिसरातील दुर्लक्षित तलावाची स्वच्छता करून गाळ उपसा करावा आणि स्थानिकांसाठी जलसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परिसरात नवीन गृहप्रकल्प उभे राहत असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. सिडकोकडून पुरविण्यात येणारे टँकरही अपुरे पडत असून, पाणीटंचाईचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सुटेपर्यंत सिडकोने नवीन बांधकामांना प्रारंभ प्रमाणपत्र (CC) आणि भोगवटा प्रमाणपत्र (OC) देण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
खारघरमधील ओवे कॅम्प परिसरातील तलावाची योग्य स्वच्छता व गाळ उपसा केल्यास उपलब्ध जलसाठ्याचा उपयोग करून खारघरसह तळोजा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सिडकोने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.
या वेळी खारघरचे माजी शहरप्रमुख गुरुनाथ पाटील आणि माजी शहर समन्वयक रामचंद्र देवरे उपस्थित होते.
:फोटो  शिवसेनेची मागणी


Discover more from पनवेल गावकरी संकेत

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading