‘मराठी माझी देवालाही आवडे’ सांस्कृतिक कार्यक्रम; रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा – लोकनेते रामशेठ ठाकूर

लेखक:

सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमंत्रण लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देताना पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे पदाधिकारी

पनवेल (प्रतिनिधी) मराठी भाषा, संतसाहित्य आणि संगीतपरंपरेचा समृद्ध वारसा उलगडणारा ‘मराठी माझी देवालाही आवडे’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमंत्रण निमंत्रक म्हणून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देण्यात आले.


Discover more from पनवेल गावकरी संकेत

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading