‘
पनवेल, दि.१७ (वार्ताहर) : ‘क्रांती सम्राट’ वृत्तपत्राच्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीतील कार्याचा गौरव म्हणून ‘न्यायसखी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कळंबोली येथे आयोजित कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
न्यायसखी महिला व बलात्कार समितीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समितीच्या संस्थापक-अध्यक्षा ॲड. भूमिका जाधव आणि ‘संविधान पर्व न्यूज’चे संपादक चंद्रकांत जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, समाजातील अन्याय-अत्याचार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पत्रकार बजावतात. जनतेचा आवाज बुलंद करणे आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे, या कार्याचे महत्त्व पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
दिपालीताई पारसकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या गौरवामुळे पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याला प्रोत्साहन मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
फोटो : दिपाली पारस्कर पुरस्कार
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
लेखक:

